सीएसकेची २८ कोटींची गुंतवणूक ठरली अपयशी

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
चेन्नई,
CSK's investment failed चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा लिलावात केलेला २८ कोटीचा खर्च अयशस्वी झाला आहे. आयपीएल २०२६ मधील सलग पराभवांनंतर सीएसकेच्या संघाचे कामगिरीचे विश्लेषण सुरु झाले आहे. फ्रँचायझीने नवोदित खेळाडूंसाठी केलेली प्रचंड गुंतवणूक आता प्रश्नचिन्हात आहे, तर कमी बजेटमध्ये काम करणाऱ्या खेळाडूची चमक दिसत आहे.लिलावात कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीरसाठी २८.४ कोटी रुपये खर्च केले गेले. मात्र, तीन सामन्यांनंतर दोन्ही खेळाडू त्यांच्या किंमतीच्या अपेक्षेनुसार संघासाठी फलंदाजीत योगदान देऊ शकलेले नाहीत. एका बाजूला, ९९ धावांसह सरफराज खान संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याची सरासरी ३३ असून स्ट्राइक रेट २०२.०४ आहे. आरसीबीविरुद्ध त्याने संयमी अर्धशतक झळकावले आणि सामना जिवंत ठेवला, पण संघाच्या महागड्या खेळाडूंचा फटका लक्षात येत आहे.
 
 प्रशांत वीर
 
 
कार्तिक शर्माने तीन सामन्यांत केवळ २५ धावा केल्या आहेत. प्रशांत वीरसाठी संघाने १४.२० कोटी रुपये खर्च केले, पण या खेळाडूने या मोसमात अजून एकही बॉल फेकलेला नाही. संघातील संतुलन राखण्यासाठी रवींद्र जडेज्याच्या जाण्यानंतर त्याला संधी दिली होती, पण अपेक्षित कामगिरी अद्याप दिसली नाही. सध्या सीएसकेला धोनीच्या अनुपस्थितीमुळे मोठी उणीव भासत आहे. पाच वेळा चॅम्पियन बनवण्यासाठी धोनीने संघाला ९९ टक्के योगदान दिले आहे. दुखापतीमुळे सध्या तो संघाबाहेर आहे, त्यामुळे ऋतुराजच्या कर्णधारपदावरही प्रश्न निर्माण झाले आहेत. आता धोनीच्या पुनरागमनाने संघाला पुन्हा सामर्थ्य मिळेल की नाही, हे पाहणे बाकी आहे. या मोसमात सीएसकेची परिस्थिती संघाच्या गुंतवणुकीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित करत आहे, तर कमी बजेटमधील खेळाडू संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत.