दत्तात्रय गिरी पोलिस उपनिरीक्षकपदी

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
हदगाव, 
Dattatray Giri appointed as Police Sub-Inspector तालुक्यातील मनाठा पोलिस ठाण्यात मागील सहा वर्षांपासून कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. याबद्दल सहपोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 3 एप्रिल रोजी मनाठा पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांच्या निवडीबद्दल सन्मान करीत शुभेच्छा दिल्या.
 
 
giri
 
Dattatray Giri appointed as Police Sub-Inspector यावेळी उपनिरीक्षक अशिष बोराटे, उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले, बरडशेवाळा पोलिस पाटील दत्तात्रय मस्के, गजानन मस्के, अक्षय पवार, सविता निमडगे, अश्विन राठोड, प्रभाकर दहिभाते यांच्यासह सहउपनिरीक्षक गजानन देवडे, जमादार गणेश मुरमुरे, अशोक दाढे, श्याम बनसोडे, काळुराम उघडे, विजय पवार, बालाजी रावले, कृष्णा यादव, रेणुप्रसाद भोपाळकर, रामराव राठोड, साईनाथ स्वामी, संभाजी नरवाडे, अतुल नागरगोजे, श्याम खनपटे, राहुल जाधव, मधुकर पवार, महेंद्र पुडगू, शंकर सोनटक्के, गीता वाळके, कला ठोंबरे, मंगला भोसले आणि विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.