प्रेमविवाहानंतर मद्यपी पतीचा संशयास्पद मृत्यू

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
-पत्नीच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आराेप

अनिल कांबळे
नागपूर, 
Death of an alcoholic husband दारु पिण्याच्या सवयीच्या पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरुन नेहमी वाद हाेत हाेते. त्यातून चार दिवसांपासून दारुच्या नशेत असलेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना आज साेमवारी पांढराबाेडीत उघडकीस आली. पत्नीने केलेल्या मारहाणीतच हा मृत्यू झाल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त करत कारवाईची मागणी केली. राेशन राजू सिंगारे ( 28) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयाेत रवाना केला. त्याच्या अहवालानंतच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट हाेणार आहे.
 
 
dath
 
Death of an alcoholic husband राेशन राजू सिंगारे ( 28) हा मिळेल ते काम करीत हाेता. तर प्रज्ञा उच्चशिक्षित आहे. प्रज्ञा आणि राेशनची चार वर्षांपूर्वी ओळख झाली. प्रज्ञाच्या वडिलाचे निधन झाले असून ती वृद्ध आईसाेबत राहत हाेती. राेशनने मैत्रिण असलेल्या प्रज्ञाला प्रेमाची मागणी घातली. तिनेही हाेकार दिला. दाेघांचे प्रेमसंबंध एक वर्ष सुरु हाेते. शेवटी दाेघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दाेघांनाही दारुचे व्यसन जडले. त्यामुळे दाेघेही घरी दारु ढाेसत हाेते. दारु प्यायल्यानंतर दाेघांमध्ये नेहमी हाणामारी हाेत हाेती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुरा किरणा स्टाेअर्स जवळ पहिल्या माळ्यावर भाड्याने खाेली करून राहणाèया राेशन आणि त्याची पत्नी प्रज्ञा यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू हाेते. दाेघांनाही मद्याचे व्यसन आहे. राेशन आणि प्रज्ञामध्ये दाेन महिन्यांपूर्वी देखील असेच भांडण झाले हाेते. मद्याच्या नशेत राेज शिविगाळ करणाèया राेशनला प्रज्ञाने यापूर्वीही मारहाण करून जखमी केले हाेते. अंबाझरी पाेलिसांनी पत्नी प्रज्ञा विराेधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हासुद्धा दाखल केला हाेता. गेल्या चार दिवसांपासून राेशन सकाळपासूनच मद्याच्या नशेत प्रज्ञाला शिवीगाळ करत हाेता. ताे काहीही खात नसल्याने नातेवाईकांनी प्रज्ञानेच मारहाण केल्याची तक्रार करत राेशनला पाेलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. मात्र त्याच्या शरीरावर सकृतदर्शनी मारहाणीच्या जखमी नाहीत. त्यामुळे पाेलिसांनी आकस्मात मृत्यूची नाेंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयाेत पाठवला. त्याच्या अहवालानंतच राेशनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट हाेणार आहे.