मामा-भाचाचा अपघाती मृत्यू

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
धारणमहू गावातील रहीवाशी
 
धारणी, 
Dharanamahu : Accidental death रविवारी धारणीजवळच्या दिया गावातील दोन सख्ख्या बहिणी सिपना नदीत बुडून मरणपावल्यानंतर सोमवारी दिया जवळच्या धारणमहू गावातील मामा - भाचे असलेले शेखर आणि राज या दोन युवकांचा एका सडक अपघातात मोक्यावरच मृत्यू झाल्याने धारणी परिसरात शोककळा पसरलेली आहे. घटनास्थळ धारणीपासून १५ किमी अंतरावरील देडतलाई जवळच्या महू नाल्याचे आहे. हे स्थान मध्य प्रदेशच्या खकनार पोलिस ठाणे अंतर्गत असल्याने दोघांचे मृतदेह खकनार प्रा. आ. केंद्रात पोहचवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केल्यावर धारणमहू गावात अन्त्यसंस्कार करण्यात आले.
 
 
dath
 
Dharanamahu : Accidental death  शेखर सुरेश धुर्वे (१८) आणि राजाराम जांबेकर (१९) रा. धारणमहू ता. धारणी हे दोघेही एमएच २७ ईडी ७८५६ क्रमांकाच्या दुचाकीने दाहिंदा (म. प्र.) येथून लग्न आटपून मध्यरात्रीनंतर परतत होते. शेखरचा काका श्यामचंद बहरा मावस्कर (४१, रा. धारणमहू) हा पण एका दुसर्‍या दुचाकीवर होता. समोर मामा-भाचे शेखर व राज होते. देडतलाईच्या महू नाल्याजवळ विरुद्ध दिशेने एमएच ०६ - बीडब्ल्यू - ०५०३ क्रमांकाची पिकअप तीव्र गतीने येत होती. पिकअपने दुचाकीला ठोस मारल्याने दोघांचा मृत्यू घटना स्थळावरच झाला. हे दृष्य काका श्यामचंदने आपल्या डोळ्यांनी पाहले. श्यामचंदने पोलिस चौकीत सूचना दिल्यावर खकनार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई केली. घटनेची माहिती मिळताच धारणी तालुक्यात सतत दुसर्‍या दिवशी एकच हळहळ व्यक्त होत राहीली. धारणमहूचे उपसरपंच तथा खरेदी विक्री सोसायटीचे संचालक राजकुमार मालवीय हे घटनास्थळावर पोहचले. दिवसभर खकनार गावात घालवताना पोलिस पथकाला सहकार्य केले. सोमवारी दुपारी अंत्यविधी करण्यात आला. घटनेची नोंदणी वसीम खान यांनी करुन पुढील चौकशी खकनार ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर लोने करत आहेत. सतत दोन दिवस धारणीसाठी काळ ठरलेले आहेत.