वर्धा,
Drawn from the Thiyya movement आदिवासी समाजाच्या प्रलंबित समस्यांना घेऊन राष्ट्रीय भारत आदिवासी पार्टीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंबंधीचे एक निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे. येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासींचा विकास होण्याऐवजी त्यांचे शोषण होत असून सदर प्रकरणातील अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, एका आदिवासी शेतकर्याला त्याच्या उपजिविकेच्या साधनापासून वंचित करून त्याची फसवणूक केली आहे, सदर प्रकरणातील दोषींवर तात्काळ चौकशी लावावी, दहेगाव स्टेशन येथील आदिवासी समाजाच्या जागेवर गैरआदिवासींनी कब्जा केला असून त्यांच्यावर अनु. जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, करंजी काजी ग्रामपंचायतीतील सचिव हा एकेरी राजकारण करून भ्रष्टाचार करीत आहे.

त्याची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे, आदिवासी समाजातील क्रांतिकारी, दैवत यांचे पुतळे बसवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यास टाळाटाळ होत असून पुतळे बसवण्याची परवानगी देण्यात यावी, गेल्या १५ ते २० वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे, आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. सदर आंदोलन राष्ट्रीय भारत आदिवासी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंगेश सराटे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. या आंदोलनात दुर्गा मसराम, आशा भलावी, सुनीता मडावी, पुष्पा भलावी, यशोदा मसराम, मंदा तोडासे, ज्योतिराम तुमडाम, कुंदा उईके, वनिता जुन्नाके, सुवर्णा सलाम, रेखा मोकाशी, आरती जुन्नाके, रुपाली मोकासी, सुरेखा सलाम, गजानन जुन्नाके, गजानन उईके, संदीप मंगाम आदींनी सहभाग घेतला.