गोंदिया,
gondia-railway-station : गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर डिस्मेटंलींगचे काम सुरू असल्याने या फलाटावरून येणार्या ५२ रेल्वेगाड्यांचे प्लॅटफॉर्म तात्पुरते बदलण्यात आले असून प्लॅटफॉर्म ३ वरून धावणार्या गाड्या आता प्लॅटफॉर्म १ आणि २ वर स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्यातच आधीपासूनच प्लॅटफॉर्म १ आणि २ वरून धावणार्या गाड्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी, आणि स्टेशनच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामाचा एक भाग म्हणून, गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर डिस्मेंटलिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे स्थानकावरील ५२ रेल्वेगाड्यांचे निर्धारित फलाट तात्पुरते बदलण्यात आले आहेत. रेल्वेगाड्यांचे सुरक्षित आणि सुरळीत संचालन सुनिश्चित करण्यासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्या प्रवाशांनी स्थानकावर पोहोचल्यानंतर घोषणा प्रणाली, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आणि रेल्वे कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार आपला फलाट निवडावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.