उन्हाळ्यातील ‘हेल्दी ड्रिंक’ म्हणून अंबाडी सरबताचा उदय

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
कृत्रिम थंड पेयांना पर्याय
आरोग्यदायी लाभ आणि शेतकèयांना आर्थिक आधार

विजय आडे
उमरखेड, 
‘Heldi ḍrink’ ambaḍi sarabat उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात रंगीबेरंगी, कृत्रिम रसायनयुक्त थंड पेयांची रेलचेल वाढते. आकर्षक जाहिरातींना भुलून आपण शरीराला थंडावा देण्याच्या नावाखाली साखर, कृत्रिम रंग व प्रिझर्व्हेटिव्हयुक्त पेयांचे सेवन करतो. परंतु, आपल्या पारंपरिक आहार संस्कृतीत याला उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहे. अंबाडी ही ग्रामीण भागात सहज उपलब्ध होते. तिच्या फुलांच्या पाकळ्या व देठ वाळवून पावडर तयार करतात.
 
ambadi
 
आरोग्यदायी फायदे
शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते. नियमित व मर्यादित सेवनाने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत. फायबर व नैसर्गिक आम्ल पचनक्रिया सुधारतात. अँटीऑक्सिडंटसमुळे रक्तातील अशुद्धी कमी होण्यास मदत. ‘व्हिटॅमिन-सी’मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
अर्थव्यवस्थेला चालना
अंबाडीची लागवड कमी खर्चात होते. त्यामुळे शेतकèयांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो. स्थानिक शेतकèयांकडून पावडर खरेदी केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि स्थानिक शेतकèयांना ‘प्रोत्साहन’ देण्यास मदत होईल.
अंबाडीचे पोषणमूल्य
‘Heldi ḍrink’ ambaḍi sarabat  अंबाडीत नैसर्गिक अँटीऑक्सिडंटस, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम फायबर असते. शरीरातील उष्णता वाढते आणि घामामुळे क्षार व पाण्याची कमतरता निर्माण होते. अशावेळी अंबाडी सरबत शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत करते. त्याचा नैसर्गिक आंबट-गोड स्वाद शरीराला ताजेतवाने करतो.

कृत्रिम पेयांपेक्षा अधिक श्रेष्ठ
बाजारातील बहुतांश थंड पेयांमध्ये साखर, कृत्रिम रंग व रासायनिक संरक्षक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते. दीर्घकाळ सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेह व पचनबिघाडासारख्या समस्या वाढू शकतात. याउलट अंबाडी सरबत पूर्णपणे नैसर्गिक, रसायनमुक्त व पारंपरिक असल्यामुळे शरीराला अपाय न करता पोषण देते.

तयार करण्याची पद्धत
अंबाडी पावडर एक-दोन चमचे पाण्यात भिजवून गाळावी. त्यात चवीनुसार गूळ किंवा खडीसाखर, चिमूटभर मीठ व जिरेपूड घालून थंड पाणी मिसळावे. पुदिना किंवा तुळस घातल्यास चव आणखी वाढते. दुपारच्या उन्हात एक ग्लास अंबाडी सरबत शरीराला त्वरित ऊर्जा देते.