पुल व संरक्षण भिंतीसाठी कोट्यवधींच्या कामांचा शुभारंभ

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नागपूर,
works worth crores तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून देवग्राम, दिंदरगाव, खरसोली आणि थुगाव निपाणी या गावांना जोडणाऱ्या पुलासह संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी सुमारे १२.०५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसेच त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. स्थानिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
 
 
nagpur
 

सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र