जालना,
jalna-volcanic-scene : जालन्यातील सामनगाव रोड परिसरात धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. जमिनीतून अचानक काळा ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिक घाबरले आहेत. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांमध्ये चर्चा सुरु आहे की ही ज्वालामुखीची सुरुवात आहे का?
सदर ठिकाणी खडकाळ जमिनीतून काही वितळलेले खडक बाहेर येत आहेत. नागरिक म्हणतात की, वाफा आणि जळत असल्यासारखा पदार्थ दिसत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पोलमधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे जमिनीतून हा पदार्थ बाहेर येत असल्याचा अंदाज आहे. घटना पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली असून प्रशासन आणि स्थानिक तज्ज्ञ यांच्याकडून त्वरित पाहणी सुरु आहे.