अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
juvenile correctional home काका व चुलत भावावर चाकूने हल्ला करून खून करणार्‍या अल्पवयीन आरोपीस शहर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. हा दुहेरी हत्याकांड स्थानिक महिलाश्रम भागात घडली होती. रितेश प्रभाकर भलमे (२५) व प्रभाकर फुलचंद भलमे (५४) दोन्ही रा. बरबडी हे लग्नसोहळा आटोपून ट्रॅव्हल्सने महिलाश्रम जवळील हनुमान मंदिराजवळ उतरले होते. मात्र, दबा धरून असलेल्या अल्पवयीन मुलाने रितेशवर चाकूने सपासप वार केले. मध्यस्थी गेलेल्या प्रभाकर भलमे यांच्यावरही वार केले. यात बापलेकाचा मृत्यू झाला.
 
 
ty6787
 
 
शहर पोलिसांनी मारेकरी अल्पवयीन मुलास अटक केली. चौकशीदरम्यान मारेकरी व मृतकांमध्ये जागेचा वाद होता. यापूर्वी त्यांचा हा वाद सेवाग्राम पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्याची माहिती आहे. त्यावेळी दोन्ही बाजूकडून तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर रितेश व प्रभाकर हे या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. अशातच आरोपीने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन खरेदी केलेल्या चाकूने रितेश व प्रभाकर यांच्यावर हल्ला केल्याची कबुली चौकशीदरम्यान शहर पोलिसांना दिली. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.