करिश्मा तन्ना बनणार आई!

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |

karishma tanna
 
 
मुंबई,
Karisma Tanna will become a mother टीव्ही आणि ओटीटी अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. तिने पती वरुण बंगेरासोबतचे खास फोटो शेअर करून आपल्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. या फोटोंमध्ये जोडप्याचा आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसतो. सोशल मीडियावर या बातमीच्या प्रसारणानंतर चाहत्यांनी आणि कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये 'मॉम अँड डॅड' लिहिलेल्या टोप्या घालून त्यांच्या कुत्र्यांसोबत हसताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ते लहान मुलाचे मोजे हातात घेऊन उभे आहेत, तर तिसऱ्या फोटोत एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त करत आहेत.