सेलू तालुक्यात ४६३६८ हेटरमध्ये होणार खरिपाची पेरणी

८०७० विंटल बियाण्यांची गरज

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
सेलू, ६ एप्रिल
Kharif sowing in Selu taluka सततच्या नापिकीमुळे त्रस्त असतानाही शेतकर्‍यांनी खरिपाची तयारी सुरू केली असताना कृषी विभागही नियोजनाला लागला आहे. तालुयात ४६ हजार ३६८ हेटरमध्ये खरिपाचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. मागील खरीप हंगामात कपाशीचे उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांची भिस्त गहू पिकावर आली. गव्हाचे पीक समाधानकारक झाले असल्याचे शेतकरी सांगत आहे. तुरीचे पीक झाले, पण भावबाजीमुळे उत्पन्न कमी आले. त्यामुळे शेतकरी पेरणीचे नियोजन काय करतात हे महत्वाचे ठरणार आहे. सेलू तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले असून यात २२ हजार ७५० हेटरमध्ये कपाशी, १६ हजार ६८८ हेटरमध्ये सोयाबीन हे दोन मुख्य पीक राहतील, असा अंदाज आहे.
 
 

Kharif sowing in Selu taluka 
 
ज्वारी २० हेटर, बाजरी २, मका ५००, तूर ६२३८, मूग ४५, उडीद ५५, तिळ १०, सूर्यफूल ३९, भुई मुंग ३० हेटरमध्ये राहतील. या दृष्टीने बियाण्याची मागणी नियोजन ज्वारी १.६ विंटल, बाजरी ०.०८, मका ७५, तूर २६२, मूग १.२, उडीद २.३, सोयाबीन ७२५९.२८, तिळ ०.१, सूर्यफूल ३, भुई मूग १०.५, कापूस ४५५ विंटल असे एकूण ८०७०.०६ विंटल बियाण्याच्या मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात कमी खर्चाचे पीक म्हणून तूर पिकाला ओळखले जाते. सध्या शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने व रासायनिक खताचे भाव वाढल्याने सेलू तालुयात तुरीचा पेरा वाढणार असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
 
 
 
मागील तीन वर्षांपासून कपाशीचा पेरा सारखाच होत असून याही खरीप हंगामात कपाशीचा पेरा मागील हंगामा एवढाच राहील. सोयाबीन तुरीच्या पेर्‍यात अदला बदल होऊ शकते. बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती पं.स.चे कृषी अधिकारी सुनील मुरारकर यांनी दिली.