श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती ब्रह्मत्वात विलीन

लाखो भाविकांच्या जनसागरात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
महायोग्याचे महाप्रयाण...
 
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर, 
Mahant Madhusudan Bharati news भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान व निद्रास्थान असलेल्या श्रीदत्त शिखर संस्थानचे 30 वे महंत मधुसूदन भारती गुरू अच्युत भारती वयाच्या 95 व्या वर्षी वैकुंठवासी झाले. चार तपांची अखंड साधना पूर्ण करून हे महायोगी रविवारी ब्रह्मत्वात विलीन झाले. ‘प्रायोपवेशन’ या अत्यंत कठीण आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करून त्यांनी शनिवार, 4 एप्रिल रोजी संध्याकाळी 5.5 वाजता आपला देह ठेवला होता. रविवार, 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्यांना विधिवत समाधी देण्यात आली.
 
 

Bharati news 
 
 
महंत मधुसूदन भारती हे वैकुंठवासी झाल्यानंतर संस्थानच्या परंपरेनुसार, अंत्यसंस्कारापूर्वी नवीन महंतांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. अत्यंत पारदर्शक पद्धतीने तीन वेळा ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्यात आली. विशेष म्हणजे, तिन्ही वेळा डॉ. धनेश्वर भारती गुरू आनंद भारती श्याम महाराज यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यानुसार त्यांना संस्थानचे 31 वे महंत म्हणून घोषित करण्यात आले.
संस्थानच्या नियमाप्रमाणे विधिवत सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडून नवीन महंत डॉ. धनेश्वर भारती हे परंपरागत गादीवर विराजमान झाले. त्यानंतर मधुसूदन भारती यांना समाधी देण्यात आली. या अंत्यविधी सोहळ्याला देशातील विविध पीठांचे साधू-संत, संस्थानचे विश्वस्त, खासदार, आमदार व विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह लाखो दत्त भक्तांनी उपस्थित राहून महंतांच्या चरणी दर्शन घेतले.
महंतांच्या निधनाचे वृत्त वाèयासारखे पसरताच नांदेड, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा महापूर माहूर गडाकडे लोटला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. महंतांच्या सन्मानार्थ व्यापाèयांनी प्रतिष्ठाने, हॉटेल्स व भोजनालये बंद ठेवली होती. मात्र, बाहेरून येणाèया भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थानाच्या वतीने श्री दत्त शिखर संस्थानवर आणि स्थानिक दत्तभक्तांनी शहरातील ‘टी-पॉइंट’ येथे मोफत भोजन व पाण्याची व्यवस्था केली होती.