मेंढोली पिंपरी (कायर) रस्त्यासाठी बेमुदत उपोषण

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
6 वर्षांपासून प्रलंबित कामावरून संताप

वणी, 
Mendholi Pimpri: Indefinite hunger strike for road तालुक्यातील मेंढोली ते पिंपरी (कायर) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जंगल परिसरातील अपूर्ण 600 मिटर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे यांनी ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांसह शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 
 
upotion
 
हा रस्ता सुमारे 4 किमी लांबीचा असून 2018-19 मध्ये शासनाकडून त्यास मंजुरी मिळाली होती. खनिज विकास निधीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग वणीमार्फत कंत्राटदाराकडे काम सोपविण्यात आले आणि कामालाही सुरुवात झाली. मात्र वनविभागाच्या हद्दीतील 600 मीटर रस्त्याच्या कामावर अडथळे निर्माण झाले. वनविभागाने 2020 मध्ये काही त्रुटी दर्शविणारे पत्र दिले होते. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक पूर्तता न केल्याने काम रखडले. परिणामी मंजूर निधी परत गेला असून जंगलातील रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून काम पूर्ण झाले, निधी खर्च झाला असा दावा करण्यात येत असल्याने संशय निर्माण झाला आहे.
 
 
Mendholi Pimpri: Indefinite hunger strike for road  या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. केवळ मातीकामासाठी 50 लाख रुपये खर्च होणे शक्यच नाही, असा आक्षेप घेण्यात येत आहे. वन परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक सहभागी झाले आहेत. रस्ता पूर्ण झाला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देणार, की हा रस्ता अजूनही कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.