अल्पवयीन मुलाला दुचाकी देणे भाेवले

- पालकाला 30 हजार रुपयांचा दंड

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
minor two wheeler challan वाहतूक पाेलिसांनी एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवताना पकडले. त्याच्यावर कारवाईची माहिती मिळताच पालक घटनास्थळी आले आणि पाेलिसांशी वाद घालत शिविगाळ केली. या प्रकरणी पाेलिसांनी मुलाच्या वडिलांविरुद्ध माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
 
अल्पवयीन मुलाला दुचाकी देणे भाेवले
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी वाहतूक झाेनचे पाेलिस हवालदार सुरेश चाैधरी हे रविवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता सहकाऱ्यांसह एमआयडीसी पाॅइंट येथे कर्तव्यावर हाेते. पाेलिस निरीक्षक सारंग मिराशी आणि पाेलिस उपनिरीक्षक रतन उंबरकर यांच्या मार्गदर्शनात वाहन तपासणी सुरु हाेती. हवालदार चाैधरी यांना एक 16 वर्षीय मुलगा दुचाकी चालवताना आढळून आला. पाेलिसांनी त्याला थांबवून परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यानंतर पाेलिसांनी त्याचे वय पडताळण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली असता ताे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.minor two wheeler challan पाेलिसांनी तत्काळ त्याच्या पालकांना माहिती दिली. पालक इतर नातेवाईकांसह घटनास्थळी दाखल झाले. मुलगा अल्पवयीन असूनही वाहन चालवत असल्याची माहिती असतानाही त्यांनी पाेलिसांच्या कारवाईला विराेध केला. तसेच आक्षेपार्ह वक्तव्ये करत गाेंधळ घातला. या प्रकरणी पाेहवा चाैधरी यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी माेटार वाहन कायद्याच्या कलम 199 (अ) अंतर्गत गुन्हा नाेंदवून पुढील तपास सु अल्पवयीन मुलाला दुचाकी देणे भाेवले रू केला आहे.