पेट्रोल पंपावरून पैशाची बॅग लंपास

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
१ लक्ष ३० हजाराचा फटका
 
वरूड, 
Money bag stolen शहरातील पांढुर्णा चौक ते केदार चौक या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील यावलकर पेट्रोल पंपावर सोमवार ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या दुचाकीवरील पैशाने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली, त्यामुळे सर्वत्र चर्चेला एकच पेव फुटला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व पहाणी केली. त्यानंतर फिर्यादी यांची रितसर तक्रार नोंदवून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
 
 
petrol
 
Money bag stolen  प्राप्त माहितीनुसार, सुधाकर पंजाबराव चौधरी (५२, रा.देऊतवाडा) हे त्यांच्या दुचाकीने शहरातील एसबीआय बॅकेत पैसे काढण्यासाठी आले. त्यांनी त्यांच्या खात्यातून १ लक्ष ३० हजार रुपये काढले. तेथून ते आपल्या दुचाकीने त्यांच्या भावाला भेटण्यासाठी खरेदी विक्रीत गेले. तेथून ते यावलकर पेट्रोल पंपावर लघुशंका करण्यासाठी थांबले. तेव्हा त्यांनी पैशाने भरलेली बॅग त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डलला लटकवून ठेवली होती. लघुशंका करून परत आल्यानंतर त्यांना ती बॅग दिसून आली नाही. कुणीतरी अज्ञात चोरट्याने पैशाने भरलेली बॅग लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत वरूड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही पहाणी केली. परंतु, पंपावरील सर्व कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. इन कॅमेरे सुरू असल्याने संशयित अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजु मडावी पुढील तपास करीत आहे.