खा. अमर काळे संसदीय स्थायी समितीच्या अभ्यास दौर्‍यावर

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
वर्धा,
mp amar kale खासदार अमर काळे हे संसदीय स्थायी समितीच्या शिक्षण, महिला, बालकल्याण, युवक कल्याण व क्रीडा समितीवर असल्याने या समितीचा ७ ते ९ एप्रिल पर्यंतच्या श्रीनगर येथील आयोजित अभ्यास दौर्‍यात ते सहभागी होणार आहेत.
 


mp amar kale 
 
या समितीच्या अभ्यास दौर्‍यात ते भारत सरकार व जम्मू काश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण संस्था विभाग, केंद्रीय विद्यापीठ, काश्मीर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यासोबतच शालेय शिक्षण विभाग, युवक कल्याण विभाग, जम्मू काश्मीर सरकारच्या युवक व क्रीडा विभाग, क्रीडा विषयक तसेच जम्मू काश्मीर सरकारच्या क्रीडा, युवक कल्याण, बालकल्याण, महिला कल्याण, शालेय शिक्षण या संबंधीत अनेक संस्थांना या दौर्‍यात भेटी देणार आहेत.mp amar kale संस्थेतील संबंधीत पदाधिकार्‍यांसोबतही समिती चर्चा करणार आहे. या समितीमध्ये खासदार अमर काळे यांचा समावेश असून त्यांच्या या अभ्यास दौर्‍यात मिळणारी या क्षेत्रातील माहिती ही त्यांच्या वर्धा लोकसभा मतदार संघातील या विभागांच्या सुद्धा उपयोगी पडावी, या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.