नागपूर,
nagpur-railway-station : मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वेस्थानकावर विविध विकास कार्यासाठी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ हा पुढील ५२ दिवसपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. येत्या बुधवार, ८ एप्रिल ते २९ मे असे एकूण ५२ दिवसपर्यंत बंद राहणार असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
विकासकार्यासाठी रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक
मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक वर ट्रॅफिक ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर अंशतः परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधाचे कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने, रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मार्फत विविध कामकाजासाठी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन बुधवार, ८ एप्रिल ते २९ मे असे एकूण ५२ बंद राहणार आहे. रेल्वे वाहतूक अडथळ्यासह पूर्ण सुरक्षित व सुरळीतरीत्या, रेल्वे वाहतूक अडथळ्यासह पूर्ण करण्यात येणार आहेत. याच कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरूनच रेल्वे गाड्यांची ये-जा करण्यात येईल. या कालावधीत कोणतीही रेल्वे गाडी रद्द करण्यात आलेली नाही.
अजनी स्थानकावर अंशतः समाप्त
गाडी क्रमांक ०११४० मडगाव ते नागपूर विशेष (गुरुवार,दिनांक ९ ते २८ एप्रिल दरम्यान अजनी स्थानकावर अंशतः समाप्त करण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक ०११३९ नागपूर ते मडगाव विशेष (बुधवार, शनिवार) ही ८ एप्रिल ते २७ मे दरम्यान नागपूर ऐवजी अजनी स्थानकावरून अंशत समाप्त होईल.
खालील गाड्या गाड्यांचे मार्गांतर
गाडी क्रमांक ०७०७५ / ०७०७६ हैदराबाद ते गोरखपूर आणि - ते हैदराबाद तसेच गाडी क्रमांक ०५०७३ / ०५०७४ केएसआर बेंगळुरू - लालकुआ आणि लालकुआ ते केएसआर बेंगळुरू विशेष गाडी क्रमांक ०६५०९ / ०६५१० केएसआर बेंगळुरू ते दानापूर आणि दानापूर ते केएसआर बेंगळुरू विशेष गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येतील.