EPFO 3.0: आता PF पैसे ATM-UPI ने काढणे सोपे; जाणून घ्या मर्यादा

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
pf-money-withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) EPFO 3.0 सुरु केलं आहे, ज्यामुळे पीएफ काढणे आता खूप सोपे झालं आहे. आधी लोकांना PF साठी बँकेत किंवा कार्यालयात लांब रांगा लावाव्या लागायच्या, पण आता तुम्ही थेट एटीएम किंवा UPI च्या माध्यमातून मिनिटांत निधी काढू शकता.
 
 
 
PF
 
 
तरीही काही नियम आहेत. एक महत्वाची अट अशी आहे की, एटीएम किंवा UPI ने तुम्ही तुमच्या PF मधील फक्त ५०% रक्कम काढू शकता, जेणेकरून काही निधी भविष्यात उपयोगासाठी शिल्लक राहील. PF काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्डसह UNA नंबर, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड असणे आवश्यक आहे.
 
EPFO कर्मचार्‍यांसाठी खास ATM कार्डही तयार करणार असून, यामुळे पैसे काढणे अधिक सुलभ होईल. EPFO 3.0 च्या या सुविधेमुळे आता PF काढणे जलद, सोयीस्कर आणि डिजिटल पद्धतीने शक्य झाले आहे.