डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
praveen-kumar-deore : डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार दि. ६ एप्रिल रोजी स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देवरे यांचे स्वागत करून प्रशासकीय सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. देवरे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामात गतीमानता आणण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 

lkjlk