आौद्योगीक वसाहतीच्या विकासासाठी निधी द्या!

ना. गडकरी यांचेशी चर्चा

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
 
nitina
 
 
वाशीम,
Provide funds for industrial estates नितीन गडकरी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, यांच्या नागपूर येथील निवासस्थानी वाशीम एमआयडीसी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत वाशीम एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांचा विकास तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, अंतर्गत रस्ते बांधणी व सौंदर्यीकरण, मोठ्या भूखंडांचे उपविभाजन करून लघुउद्योगांना संधी उपलब्ध करून देणे तसेच अखंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत मुद्देसूद विचारमंथन झाले. या बैठकीस माजी आमदार विजय जाधव, औद्योगिक विकास संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. अंगत राऊत, उपाध्यक्ष संदीप धोटे, मुख्य सल्लागार अतुल भुतकर तसेच सचिव कृष्णा चौधरी उपस्थित होते. बैठकीदरम्यान वाशीम एमआयडीसीमधील विविध अडचणी व समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या. यावर नितीन गडकरी यांनी सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला व पुढील कार्यवाहीसाठी आश्वासन दिले. ही बैठक वाशीम एमआयडीसीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, औद्योगिक क्षेत्राला नवीन दिशा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.