कतारच्या जहाजांना मिळाली होर्मुझमधून जाण्याची परवानगी!

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
तेहरान,
Qatari ships allowed through Hormuz युद्धकाळात गॅस पुरवठ्याबाबत चिंता कमी झाली आहे. युद्धानंतर पहिल्यांदाच कतारच्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी मिळाली आहे. तेहरान आणि दोहा यांच्यातील करारानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने कतारच्या जहाजांना ही परवानगी दिली आहे. या दोन जहाजांमध्ये एलएनजी भरलेले असून, ते होर्मुझमधून प्रवास करतील. या जहाजांना मिळालेल्या परवानगीमुळे जगभरातील गॅस पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
 
 
 

Qatari ships 
केप्लरच्या आकडेवारीनुसार, एलएनजीने भरलेली 'रसिदा' आणि 'अल दाईन' ही दोन जहाजे होर्मुझच्या दिशेने जात आहेत. होर्मुझ पार केल्यानंतर, ही जहाजे प्रथम ओमानच्या आखाताकडे जाईल आणि त्यानंतर आपापल्या देशांमध्ये पोहोचून मागण्या पूर्ण करतील. कतार जगाला अंदाजे १९ टक्के गॅस पुरवठा करतो. २०२४ मध्ये कतारने ७७.२३ दशलक्ष मेट्रिक टन गॅसचा पुरवठा केला होता. भारत, चीन, पाकिस्तान तसेच बहुतेक युरोपीय देश कतारकडून गॅस खरेदी करतात.
 
 
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कतारकडून गॅस पुरवठा करणाऱ्या देशांची परिस्थिती गंभीर झाली होती. आता जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने जागतिक गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, इराण या जहाजांना किती काळ वाहतूक करण्याची परवानगी देईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. कतार किंवा इराण यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मध्यपूर्वेत सध्या कतार आणि इराण यांच्यात गुप्त कराराच्या चर्चाही सुरू आहेत. या चर्चेनुसार, कतारने इराणला अमेरिकेकडून मिळालेले काही पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे, जे कतारच्या बँकेत अडकलेले होते. या करारानंतर इराणने कतारवरील हल्ले थांबवले आहेत.