आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत आयटी विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नागपूर,
collegiate competitions गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे विभागात आनंदाचे वातावरण आहे. द्वितीय वर्ष आयटी शाखेतील विद्यार्थिनी स्नेहल मोहर्कर आणि अचल धाबळे यांनी तुलसीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. “कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट कचरा देखरेख प्रणाली” या अभिनव विषयावरील त्यांच्या सादरीकरणाला उपयुक्तता आणि तांत्रिक दृष्टिकोनामुळे विशेष दाद मिळाली.
 
collegiate competitions
 
तसेच, तृतीय वर्ष आयटीच्या प्रकल्प गटानेही उल्लेखनीय यश मिळवले. निशांत झाडे यांच्या नेतृत्वाखाली कलश, सेजल रहांगडाले आणि राजनंदिनी गायकवाड या सदस्यांनी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत आयोजित प्रकल्प स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. collegiate competitions “स्वयंचलित सौर ट्रॅकरचे संकरीकरण” या प्रकल्पाने नवकल्पना, कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष उपयोगिता यामुळे परीक्षकांना प्रभावित केले. या प्रकल्पासाठी प्रा. वंदना चौबे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
या यशाबद्दल माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत गुमगांवकर आणि संपूर्ण विभागाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला. collegiate competitions प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत संस्थेचा गौरव वाढवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची ही यशस्वी कामगिरी संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नवोपक्रम आणि सर्वांगीण विकासाच्या बांधिलकीचे द्योतक आहे. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, सचिव व आमदार ॲड. अभिजीत वंजारी, कोषाध्यक्षा व आरटीएमएनयू सेनेट सदस्या डॉ. स्मिता वंजारी तसेच प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र