हिवरा आश्रम,
seaplane to land at koradi dam विवेकानंद आश्रमाने कोराडी धरणात निर्माण केलेले. विवेकानंद स्मारक हे जिह्या व राज्याच्या पर्यटनस्थळामध्ये एक महत्वाचे पर्यटनकेंद्र आहे. प.पू.शुकदास महाराज हे स्वामी विवेकानंदांचे उपासक होते. विवेकानंदांची शिकवण ही जगातील सर्वधर्मांसाठी व प्रामुख्याने तरूणांसाठी अत्यंत प्रेरणादायी व जीवनदर्शक आहे. विवेकानंदांचे स्मारक अधिक सुंदर व पर्यटनदृष्टया सुसज्ज असावे यासाठी संस्थेने त्यावर भरपूर खर्च केला आहे.
गेल्या वर्षी २५ जून रोजी कोराडी धरणात सी प्लेन सुरू होणार असल्याची बातमी झळकली होती. मुंबईहून प्रसिध्द झालेल्या या बातमीने जिह्यातील जनतेमध्ये आश्चर्य निर्माण झाले होते. परंतु सोमवारी दि. ६ एप्रिल रोजी कोराडी धरणाचा सर्व्हे करण्यासाठी एअर पोर्ट ॲथॉरटीच्या वतीने नियुक्त केलेल्या कंपनीच्या तज्ञांनी सर्व्हेला सुरूवात केली. कोराडी धरणावर सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी सुरू झालेला तांत्रिक सर्व्हे हा फक्त मोजमापांचा भाग नसून, या परिसराच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली महत्त्वाची योजना आहे. दरवर्षी हजारो पर्यटकांच्या भेटीने गजबजणारे हे स्मारक आता नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या सर्व्हेत पाण्याच्या प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करत लांबी, रुंदी आणि खोली यांचे अचूक मोजमाप करण्यात येईल. उड्डाणासाठी आवश्यक १००० ते १५०० मीटर सरळ व अडथळामुक्त जलपट्टी, १५० ते २०० मीटर रुंदी आणि १.५ ते ३ मीटर खोली यांची खातरजमा करून सुरक्षित सी-प्लेन उड्डाणासाठी भक्कम पाया तयार होणर आहे. वाऱ्याचा वेग, पाण्यावरील लहरी, धुके आणि दिसण्याची मर्यादा या सर्व घटकांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यात येणार आहे. परिसरातील झाडे, टेकड्या, वीजवाहिन्या यांचा वेध घेत आकाशमार्ग मोकळा आहे का, याची खातरजमा होईल. निसर्गाच्या सान्निध्यात विकास साधण्याच्या ध्यासातून जलचर, पक्षी आणि पाण्याच्या गुणवत्तेलाही तितक्याच संवेदनशीलतेने जपून शाश्वत विकासाचे धोरण राबविले जाईल. सी प्लेन हे आकाशात उडणारे विमान पाण्यावरही तरंगते. त्यासाठी विमानतळाची गरज नाही.seaplane to land at koradi dam कमी प्रवासी क्षमतेचे हे विमान कोराडी धरणाच्या पाण्यात उतरेल व पर्यटकांना विवेकानंद स्मारकरावर जाता येईल. त्यामुळे विवेकानंदांच्या विचारांचा,तत्वज्ञानाचा प्रचार जगभर व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या विवेकानंद आश्रमास जागतिक स्तरावर ओळख निर्माण होणार असल्याचा आशावाद विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केला.