देवळी,
Statement by Ramdas Tadas आज भारतीय जनता पार्टीचा ४१ वा स्थापना दिवस देशात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. भाजपाने पक्ष संघटनेत युवा पीढीला न्याय देऊन नेत्यांच्या तुलनेत कार्यकर्त्यांना महत्त्व दिले असून यामुळे पक्षसंघटन मजबूत होत आहे, असे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केले. भाजपा स्थापना दिनानिमित्त देवळी येथील भाजपा कार्यालयात आयोजित स्थापनादिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष शोभा तडस, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कारोटकर, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अंकित टेकाडे, महिला आघाडी उपाध्यक्ष शुंभागी कुर्जेकर, शहर अध्यक्ष उमेश कामडी, महिला शहर अध्यक्ष विद्या झिलपे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष योगेश आदमने यांची उपस्थिती होती.
रामदास तडस पुढे म्हणाले की, दोन सदस्य असलेला हा पक्ष आज संसदेत सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे. कार्यकर्त्यांची जिद्द आणि अपार कष्ट म्हणूनच केंद्र व राज्यात भाजपा सत्तेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात गेल्या १२ वर्षात देशात अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन ठोस पाऊले उचलली जात आहे. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत आहे व जगाला मार्गदर्शन करीत आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीतही आपला भारत प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. सर्वसामान्य जनतेला कोणतीही झळ या परिस्थीती पोहचू दिली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह देश म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हीच आपल्या नव्या भारताची ओळख असल्याचेही रामदास तडस म्हणाले.
कार्यक्रमाला रमेश सातपुते, अनिल क्षीरसागर, डॉ. श्रावण सावरकर, दिलीप खाडे, विनोद भगत, वसंत धोटे, अविनाश ढगे, अतुल पाहुणे, शंकर कामडी, दिवाकर झाडे, नगरसेवक विलास जोशी, नगरसेवक विजय गोमासे, नगसेवक प्रेमेंद्र ढोक, प्रकाश चांभारे, विश्वजीता पोटदुखे, विभावरी बजाईत, सुरेखा कारोटकर, माधुरी संकडे, दिपाली पाहुणे, कविता सुरकार, हेमा आदमने, विजय चैधरी, राकेश शेंदरे, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.