गृहिणी समाजासाठी सखी रंगचे यशस्वी प्रदर्शन

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नागपूर,
housewife community महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सखी रंग तर्फे गृहिणी समाजात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वर्षा कुलकर्णी आणि शक्ती पुसदकर यांच्या प्रयत्नांनी आयोजित केलेल्या सखी रंग प्रदर्शनाचे उद्घाटन स्मिता पत्तरकिने यांच्या हस्ते झाले, तर मृणाल पानसे, निलीमा टेंभेकर आणि माणिक पौनिकर प्रमुख उपस्थित होते.
 
nagpur
 
दोन दिवसांचे प्रदर्शन उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात पार पडले. नवोदित उद्योजकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. प्रदर्शनात विविध स्टॉल्स ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये दागिने, उन्हाळी वाळवण, कपडे, क्रोशा, ताडोबा येथील रिसॉर्ट, लहान मुलांसाठी क्राफ्ट कीट्स, बेस्ट फ्रॉम वेस्ट, पेंटिंग केलेल्या बॅग्स, रेडिमेड ब्लाउज, साडी कव्हर्स, रांगोळ्या, रेशन आर्ट आणि विविध खाद्य पदार्थ यांचा समावेश होता. housewife community या प्रदर्शनामुळे महिलांमध्ये उद्योजकतेला चालना मिळाली असून, त्यांच्या कौशल्यांना ओळख मिळण्यास मदत झाली.
सौजन्य: अमोल पुसदकर, संपर्क मित्र