टेनिसपटू लिएंडर पेस यांना 'एक्स' श्रेणीची सुरक्षा

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Tennis player Leander Paes X category पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या माजी टेनिसपटू लिएंडर पेसला केंद्रीय गृह मंत्रालयाने 'एक्स' श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या आगमनानंतर सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात राहतील. लिएंडर पेस हे भारतीय टेनिसमधील एक सुप्रसिद्ध नाव असून, ते देशभरात लोकप्रिय आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.
 
 

player Leander bjp 
भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पेस यांना राज्यभर प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गृह मंत्रालयाने 'एक्स' श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या श्रेणीत कमांडोंव्यतिरिक्त दोन सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांची संरक्षण व्यवस्था असते. पेस यांनी भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर लिएंडर पेस म्हणाले की, मोदीजींनी त्यांना आमंत्रित करून बंगाली म्हणून आणि युवा व क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आदर व्यक्त केला.