वाघाने भररस्त्यावर केली शिकार

चंद्रपूर-मूल महामार्गावरील थरार

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Tiger hunted on the road मूल-चंद्रपूर महामार्गाच्या मधोमध वाघाने गायीची शिकार करतानाचा थरार प्रवाश्यांनी अनुभवयाला मिळाला. हे द़ृश्य अनेकांनी आपल्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रित केले. ही घटना रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास चिचपल्ली वनक्षेत्रातील बिट क्रमांक 715 मध्ये घडली. चंद्रपूर-मूल हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. तिथे हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठा आहे. रविवारी सकाळी चिचपल्लीजवळ आचानक एक वाघ रस्त्यावर आला आणि त्याने गायीवर झडप घातली. शिकार केल्यानंतर वाघ शिकार रस्त्याच्या मधोमध ओढत नेताना दिसला. गायीचा मृत्यू होईपर्यंत वाघ तिचा गळा दाबून मार्गावर उभा होता. मार्गावरील नागरिक आपली वाहने थांबवून या वाघाच्या शिकारीचे दृष्य टिपत होते.
 
  

iger 
 
एसटी बस आणि कारमधील प्रवाशांनी हा थरार आपल्या कॅमेर्‍यात कैद केला. वाघाचा रुबाब आणि त्याची ताकद पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला होता. यावेळी दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाघ आपल्या शिकारीसह जंगलात दिसेनासा होईपर्यंत नागरिकांचा जमाव वाघाला बघत उभा होता.ही गाय आगाडी येथील शेतकरी राजेंद्र वाढई यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले असून, ती रस्त्याच्या कडेला चरत होती. वनविभागाने शेतकर्‍याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. गायीची शिकार करणारा हा मोठा वयस्कर वाघ वनक्षेत्रात ‘मामा टायगर’ म्हणून ओळखला जातो.