नवी दिल्ली,
UPPSC RO-ARO Result Declared उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने रिव्ह्यू ऑफिसर आणि असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. मुख्य परीक्षा आणि टायपिंग चाचणी पूर्ण झाल्यानंतर एकूण ४१९ उमेदवारांना यशस्वी घोषित करण्यात आले आहे.
या निकालानुसार ३३८ उमेदवारांची निवड रिव्ह्यू ऑफिसर पदासाठी आणि ८१ उमेदवारांची निवड असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर पदासाठी झाली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच अंतिम नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.यावर्षी अनेक उमेदवारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रिव्ह्यू ऑफिसर (सचिवालय) पदासाठी अनिल पांडे प्रथम क्रमांकावर असून, महसूल परिषदेच्या परीक्षेत दिग्विजय सिंग अव्वल राहिले. तसेच भानू मिश्रा यांनी रिव्ह्यू ऑफिसर पदासाठी प्रथम क्रमांक मिळवला.
आरओ आणि एआरओ मुख्य परीक्षा २ आणि ३ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ५,९३० उमेदवार सहभागी झाले होते. त्यानंतर, एआरओ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची हिंदी टायपिंग चाचणी १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. आयोगाने कळवले आहे की उमेदवारांचे गुण आणि कटऑफ गुण लवकरच जाहीर केले जातील. यात प्रवर्गनिहाय आणि पदनिहाय कटऑफचा समावेश असेल. तसेच कागदपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत स्वतंत्र माहिती दिली जाईल.