हिरव्यागार १४० कडूनिंब झाडांची कत्तल सुरू

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
परतवाडा - अमरावती रस्त्याचे रुंदीकरण
झाडे दिडशे ते दोनशे वर्षे जुनी
 
अचलपूर,
Widening of Parthwada - Amravati road परतवाडा अमरावती महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अडथळा येत असलेल्या दीडशे ते दोनशे वर्ष जुन्या अशा देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या हिरव्यागार कडुनिंबाच्या झाडाला तोडण्याची परवानगी वन विभागाने दिल्याने सोमवारपासून हिरव्या झाडांची कत्तल सुरू झाली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला परतवाडा - अमरावती महामार्गाचे रुंदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीते चांदुर नाकापर्यत अडथळा असलेल्या जवळपास ३०० कडू निंबाची झाडे आहे. त्यातील देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या १४० कडूनिंबाच्या झाडाची कापण्याची परवानगी वनविभागाने दिल्याने परतवाडा ते चांदूरबाजार नाक्यापर्यंतचे झाडाची कतल सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजतापासूनच संबंधित यंत्रणाच्या माध्यमातून हिरव्यागार दीडशे ते दोनशे वर्ष जुने असलेल्या इंग्रज कालीन वृक्षांची डोळ्यादेखत होत असताना पाहुन अनेकांनी संताप व्यक्त केला तर काहींनी अत्यंत तिखट शब्दात निषेध व्यक्त केला.
 
 
paudha
 
Widening of Parthwada - Amravati road अचलपूर -परतवाडा शहरातून जाणार्‍या खंडवा - अमरावती महामार्गाचे रुंदी करण्याचे काम वन विभागाच्या परवानगी करता २०१७ पासून थांबले होते. २०१७ मध्ये मंजूर झालेल्या या महामार्गात चांदुर नाकापर्यंत ३०० झाडे आहेत . रस्त्याच्या एकाकडून असलेल्या अचलपूर नगर परिषद हद्दीत १५० कडुनिंबाची झाडे तर दुसर्‍या बाजुला असलेल्या देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत १४० कडू निंबाचे झाडे होती. देवमाळी ग्रामपंचायत व वन विभागाने परवानगी दिल्याने त्या हद्दीतील १४० झाडांची कत्तल सुरू झाली आहे. अचलपूर नगर परिषद हद्दीतील एकाही झाडाला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नसल्याने ते काम थांबलेले आहे. झाडाच्या कटाईने पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तर दुसरीकडे रस्त्याचे रुंदीकरणाकरिता अडचण असलेल्या झाडांची वनविभागाने परवानगी दिल्याने तो मार्ग आता कात टाकणार आहे.
 
झाडे तोडायाच्या पहिले लावायला हवी होती
जागतिक तापमान वाढत असताना शहरात व शहरालगत असलेल्या रस्त्याच्या रुंदी करण्याकरता हिरव्यागार झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. याचे आम्हाला खूप दुःख आहे. रस्ता रुंदी करण्याकरिता आधीच तेवढ्या झाडाची लागवड करायला हवी होती, नंतरच ही झाडे तोडायला हवी होती.
-योगेश खानझोडे
अध्यक्ष, आदिवासी पर्यावरण रक्षा संघटना, परतवाडा