महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करत होता?

मोबाईल चॅट-ऑडिओ क्लिप्समधून उघडला धक्कादायक प्रकार

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नाशिक,
ashok-kharat : भोंदूबाबा अशोक खरातकडे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. तपासात समोर आले आहे की, तो फक्त महिलांचा लैंगिक शोषण करीत नव्हता, तर हवाला रॅकेट चालवून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करत होता. मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून त्याच्या कारवायांची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

KHARAT 
 
 
अशोक खरात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील स्पेशल रूम कायमस्वरूपी बुक करून हवाला व्यवहार करीत होता. दिवसाचे २५ हजार रुपये भाडे असलेली रूम वर्षभर त्याच्या नावावर होती. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत १०० खाती उघडून ६० कोटींपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाणही त्याने केली, काही खाती त्याचे कुटुंबीय आणि काही बनावट खातेदारांच्या नावावर होती.
तपासात असे दिसून आले की, खरात महिलांचे आधार-पॅनकार्ड वापरून सहकारी पतसंस्थांमध्ये खाती उघडत होता, जमिनी व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर करत होता आणि हवाला रॅकेट दुबईपर्यंत पोहोचवत होता. ईडीसह पोलिस तपास करत आहेत, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणात सहभागी कुणालाही सुटणार नाही.
या प्रकरणात असलेल्या मोबाईल डेटा, ऑडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्समधून खरातच्या कारवायांचा संपूर्ण तपशील समोर आला असून, आरोपीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत तपास चालू आहे.