खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

यवतमाळ जिल्हा न्यायालयाचा निकाल

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Yavatmal District Court verdict शुल्लक मजुरीच्या पैशावरून वादावरून लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून खून करणाèया आरोपीस यवतमाळ जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल सोमवार, 6 एप्रिल रोजी देण्यात आला. सचिन वंदन पाटील (26, अंजी ता. घाटंजी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अंजी येथीलच अरविंद कोहरे असे मृतकाचे नाव असून 13 जानेवारी 2020 रोजी सचिनने त्याचा खून केला होता. सचिनने अरविंद यास आज तुझा हिशोब करतो म्हणून घराबाहेर बोलावले. भांडणात ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहचले. शाब्दीक चकमक वाढत जाऊन अखेर सचिनने लाकडी दांडक्याने अरविंदच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात अरविंद कोहरेचा जागीच मृत्यू झाला होता. मृतकाची पत्नी पुनेरता कोहरे हिने दिलेल्या तक्रारी वरून घाटंजी पोलिसांनी भादंवि 302 नुसार गुन्हा नोंद केला.
 
 
 
Court verdict
 
तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांनी तपास करून प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी 6 साक्षीदार तपासण्यात आले. यात मृतकाची पत्नी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुनेरता कोहरे हिची साक्ष महत्वाची ठरली.
तसेच पंच साक्षीदार विवेक ठाकरे, राहुल डंभारे, शवविच्छेदन करणारे आर्णी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बन्सोड, तपास अधिकारी किशोर भुजाडे यांची साक्ष व इतर ग्राह्य धरून आरोपीस 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 वर्षे अधिक कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. विजय तेलंग यांनी काम पाहिले. त्यांना घाटंजी पोलिस ठाणे येथील पैरवी अधिकारी सारिका बोधनकर यांचे सहकार्य लाभले.