नागपूर,
Shantidham श्री योग साधना केंद्र, गोरेवाडा (योग शांतीधाम, नागपूर) येथे मट्टी स्नान व शरीर शुद्धीक्रिया शिबिर शेकडो साधकांच्या उपस्थितीत पार पडले. रामटेक येथील मल्टी थेरपिस्ट व कायरोथेरपिस्ट डॉ. बापू सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर मस्के, महामंत्री डॉ. गंगाधर कडू व इतर मान्यवरांनी योगगुरू आणि अनेक साधकांचे प्रेरणास्थान असलेल्या जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले.

यावेळी योगसाधक व राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी शिबिरार्थींशी संवाद साधत सांगितले, “आपण योगसाधक आहात आणि नियमित व्यायाम करता. खरंतर आपण अनेकांची प्रेरणा ठरू शकता, पण त्यासाठी जीभेला काबूत ठेवणे गरजेचे आहे. Shantidham प्रेमाचे बोल आणि संतुलित नैसर्गिक आहार यामुळेच मानवी आरोग्य व जीवनात आनंद मिळतो. आज आपण भोजन आहार म्हणून घेत नाही, तर जीभेचे चोचले पुरवतो. निसर्गात करोडो जीवजंतू सजीव आहेत; त्यांच्या दिनचर्या अभ्यासल्यास मानवी जीवन स्वावलंबी होते.” डॉ. सेलोकर यांनी विविध योगिक क्रियांबद्दल माहिती दिली, ज्यात रोग कसे तयार होतात आणि त्यांचे निराकरण कसे करावे, यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद माळवे यांनी निसर्गोपचाराचे महत्त्व स्पष्ट केले.
उषा कुर्हेकर यांनी जलधौती शुद्धीक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे दाखवली, तर सतिजा यांनी नेत्रधौती केली. संस्थेचे सहमंत्री छगन ढोबळे यांनी सूत्र नेती, सहमंत्री कृष्णा इंगोले यांनी कॅथेटर नेती आणि गंगाधर पराते यांनी जलनेती याची प्रात्यक्षिके सादर केली. नरेश भांदक्कर यांनी शरीर शुद्धीक्रियेचे महत्त्व सांगितले. Shantidham संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर मस्के यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश भुरले, कृष्णा इंगोले, नितीन जुनघरे, गजानन गाढवेकर, वाठ, किशोर भोज, डॉ. दिवाकर भोयर, ॲड. गंगाधर वैद्य, प्रभाकर देवके, किशोर पोतले व वामन तितरमारे यांचा मोलाचा सहभाग लाभला.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र