घाटंजी बसस्थानकावर ‘थंड पाणपोई’चे लोकार्पण

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
दानशूर नागरिकांचा पुढाकार
घाटंजी, 
‘Thaṇḍ panpoi'  वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तापमानाने 40 ते 42 अंशांचा टप्पा ओलांडला असून, बसस्थानकावरील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. उपलब्ध पाणीही अत्यंत गरम असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता.
 
 
pan
 
याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत घाटंजीतील दानशूर नागरिक पुढे आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, तसेच प्रभा अक्कलवार, दादासाहेब कोमावार व लक्ष्मण श्यामराव ढवळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ थंड पाण्याची ‘Thaṇḍ panpoi' ‘पाणपोई’ उभारण्यात आली. दानशूर व्यक्ती किशोर अक्कलवार, अनिल कोमावार व गजानन ढवळे यांच्या सौजन्याने मंगळवार, 7 एप्रिल रोजी या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
 
 
‘Thaṇḍ panpoi'  या उपक्रमासाठी पांढरकवडा आगारप्रमुख आशिष काकडे यांनी बसस्थानक परिसरात जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. उद्घाटन प्रसंगी आगार प्रमुख आशिष काकडे, वाहतूक नियंत्रक सविता कामळे, अनंत कटकोजवार, अनंत नखाते, महेंद्र देवतळे, संतोष अक्कलवार, अरुण कांबळे, दिनेश गाऊत्रे, संतोष पोटपिल्लेवार, विजू मोहिजे, कविता मोहिजे यांच्यासह अनेक नागरिक व प्रवासी उपस्थित होते. दरम्यान, या उपक्रमामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.