कळंबला मंत्र्यांच्या सभेत वीज बेपत्ता
कळंब,
कळंबमध्ये सोमवार, 6 एप्रिल रोजी Water shortage review पाणीटंचाई आढावा व तालुक्यातील विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन कळंब पंचायत समिती अंतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात उन्हाळ्याच्या दृष्टीने पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही समस्या निवारण्यासाठी मंत्रिमहोदयांची विशेष सभा मोठ्या थाटात तहसील कार्यालय प्रांगणात आयोजिली होती. परंतु या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असताना या कार्यक्रमांमध्ये जलजीवन व महावितरणच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. या तक्रारी मंत्रीमहोदय ऐकत असताना विद्युत वितरणचे शहर अभियंत्यांचीही कानउघाडणी करत आदेशसुद्धा देत होते.
हे सर्व महावितरणचे अभियंता ऐकत असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाला आणि तो एक ते दीड तासापर्यंत पूर्ववत होऊ शकला नाही. यावेळी कळंबचे विद्युत अभियंता आपल्या अधिनस्त कर्मचाèयांना सावकाश काम करा, कोणतीही गडबड करू नका, काही घाई नाही, असे मौखिक आदेश देऊन मंत्र्यांना आपला झटका कसा असतो हे दाखविल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. महावितरण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतचे पाणीपुरवठ्याचे मिटर बिल न भरल्याने काढून नेत असल्याने महावितरणवर मंत्रीमहोदय खूपच रागावले होते. कदाचित त्या रागाचा वचपा काढण्याकरिता तर महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला नाही ना, अशी चर्चा कार्यक्रमादरम्यान होती.
Water shortage review यावेळी जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण असून शिल्लक कामांकरितासुद्धा जलजीवनचे अधिकारी ठेकेदारांना आग्रह करत नाहीत आणि किरकोळ कामांमध्ये ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे, बहुतेक ठिकाणचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मोठा रोष व्यक्त केला. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक आपल्या मागण्या घेऊन कार्यक्रमस्थळी पोचले होते. यावेळी 2011 च्या जनगणनेनुसार ज्यांचे राहते अतिक्रमण घर व वनजमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याकरता महाराष्ट्र शासनाने मार्चमध्ये काढलेला जीआर गृहित धरून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कार्य करावे, असे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
यावेळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी भूपेंद्र बाहेकर, नगर पंचायत मुख्याधिकारी यमाजी धुमाळ तथा विद्युत वितरण, जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, रस्ते महामार्ग अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्य जनतेचा रोष विद्युत विभागावर होता. त्यात प्रामुख्याने नोंद करण्याजोगी बाब म्हणजे कळंब शहराच्या विद्युत वितरण अभियंत्याची उर्मट भाषा आणि उडवाउडवीची उत्तरे, अधिक आक्रमकपणे सर्वसामान्य जनतेशी बोलणे, यामुळे ही आढावा बैठक खूपच गाजली. सर्वसामान्य जनतेला व मंत्र्यांना झटका देणारी ठरली. आता अधिकाèयांना मंत्री झटका देणार का, अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे.