नागपूर
Chaitra Gauri tradition राणीलक्ष्मीनगर महिला मंडळाच्या वतीने गेल्या तब्बल ६५ वर्षांपासून सुरू असलेली चैत्र गौरी व्रताची परंपरा यंदाही उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमात धार्मिकतेसोबतच समाजप्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या वेळी रोहिणी उधोजी यांनी नेपाळमधील पशुपतिनाथ येथे रविंद्र पाठक यांच्या रामकथेचा अनुभव सांगितला. त्यांच्या कथेमधून श्रीरामाचे विविध नवे पैलू उलगडले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्या कथेतील वेगवेगळ्या प्रसंगांचे वाचन करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
याशिवाय, धनश्री परांजपे यांनी आळंदी येथे आयोजित शिबिरातील अनुभव कथन केले. त्या शिबिरात बलोपासक उमाशंकर यांनी दिलेल्या व्यायामाचे महत्त्व आणि सकारात्मक विचारांची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.कार्यक्रमानंतर चैत्र गौरीचा पारंपरिक प्रसाद म्हणून डाळ व पन्हे सर्व महिलांना वाटप करण्यात आले. Chaitra Gauri tradition यावेळी मंडळाच्या अध्यक्षा विभा सदावर्ते, सचिव अलका चंदेल तसेच आजी-माजी कार्यकर्त्यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौजन्य: प्रतिमा माटेगावकर,संपर्क मित्र