अनिल कांबळे
नागपूर,
obscene gestures घरामागे भांडे घासत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी परिसरातच राहणाèया तरुणाने अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना कामठी पाेलिस ठाण्यांतर्गत घडली. पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवून परिसरातच राहणाèया आराेपीला अटक केली. सचिन अशाेक चव्हाण असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठव्या वर्गात शिकते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास पीडिता घरामागे भांडे घासत हाेती. उन्हाची वेळ असल्याने परिसरात शांतता हाेती. याचा फायदा घेत आराेपी सचिन तिच्या घरात घुसला. घरी काेणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. तिने त्याला विराेध करीत आरडा-ओरड केली असता आराेपीने तेथून पळ काढला. मुलीने घटनेची माहिती आई-वडिलांना दिली.obscene gestures त्यांनी पीडितेसह नवीन कामठी पाेलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पाेलिसांनी पाेक्साेच्या कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा नाेंदविला. तत्काळ आराेपीला शाेधून काढत त्याला बेड्या ठाेकल्या.