रुग्णांची फसवणूक करणार्‍या त्या डॉक्टरावर कारवाई होईना !

आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Action taken against doctor तालुक्यातील कामरगाव येथे बी.ए.एम.एस. पदवी असताना स्वतःला ‘बालरोग तज्ञ’ म्हणून दर्शवत डॉ. गणेश ओवर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागील पंधरवड्यात उघडकीस आला. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाने संबंधित डॉटरला नोटीस बजावून १६ मार्च रोजी चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित डॉटरकडून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शंकर नांदे यांनी दिली होती.
 
 

Action taken against doctor 
 
सदर डॉटर कामरगाव येथे दवाखाना चालवित असताना दवाखान्याच्या फलकावर बी.ए.एम.एस. पदवी दर्शविण्यात आली आहे. मात्र अतिरिक्त शैक्षणिक पात्रता नसताना ‘बालरोग तज्ञ’ असा उल्लेख केल्याचे आढळून आल्याने ही बाब गंभीर मानण्यात आली आहे. अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन वैद्यकीय सेवा देणे हे समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक असून ते बोगस वैद्यकीय व्यवसायाच्या स्वरूपात येऊ शकते. त्यामुळे संबंधित डॉटरविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅटिशनर्स अ‍ॅट १९६१ मधील कलम ३३, ३४, ३६ व ३८ अंतर्गत फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात कारवाई केल्या जाईल, अशी माहिती डॉ. शंकर नांदे तालुका आरोग्य अधिकारी कारंजा यांनी त्यावेळी दिली होती. परंतु याला बराच कालावधी झाला असतानाही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून यासंदर्भात तालुयात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
 
 
 
तालुका आरोग्य अधिकारी प्रतिसाद देईना
या संदर्भात काय कारवाई झाली आणि झाली का नाही हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी वारंवार भ्रमध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कारवाई झाली का नाही आणि झाली असेल तर कोणती कारवाई झाली हे कळले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून, तालुयात या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे.