होय, महिलांचं लैंगिक शोषण केलं...

भोंदू अशोक खरातची अखेर कबुली

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat case भोंदू अशोक खरात याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून यावेळी चौकशीत धक्कादायक समोर येत आहेत.
 
ashok kharat1
चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे.
 
Ashok Kharat case वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचे नाव
Ashok Kharat case दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचं समोर आलं आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. 
 
Ashok Kharat case हवाला रॅकेटचीही ईडीकडून चौकशी  
अशोक खरात यांच्या बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. तपासात १३० हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात समता नागरी पतसंस्थेसह  विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे ६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ङ्कनॉमिनीङ्ख म्हणून असून, ती खाती त्यांच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे १००  कोटींच्या मालमत्तांवरही एऊ चे लक्ष आहे. या मालमत्ता त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. Ashok Kharat case २०२४ मध्ये पोफळे यांनी १८ रो-हाऊस आणि सुमारे ४९ गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत १९.५६ कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ५२ हून अधिक जमिनींची चौकशी ईडी करणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.