अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault एका भाेंदू बाबाने पूजा करुन आशिर्वाद देण्याच्या नावाखाली एका विवाहितेला घरात बाेलावले. तिच्या नातेवाईकांना बाहेर बसवून महिलेवर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास देवाचा काेप हाेईल, अशी भीती घातली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन सक्करदरा पाेलिसांनी लैंगिक शाेषणाचा गुन्हा दाखल करुन भाेंदूबाबाला अमरावती शहरातून अटक केली. ताहिर बेग (65) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 33 वर्षीय महिला धार्मिक स्वभावाची असून खासगी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचे पती 15 ऑक्टाेबरपासून बेपत्ता असल्याने ती तणावात हाेती. दरम्यान, एका विवाह समारंभात तिची आराेपी ताहिर बेग याच्याशी ओळख झाली. त्याने ‘महाराज’ असल्याची बतावणी करीत तिच्या पतीला परत आणण्याचे आमिष दाखवले. आराेपीने महिलेचा विश्वास संपादन करून तिला पूजा करण्याच्या बहाण्याने एका खाेलीत बाेलावले. त्यानंतर नातेवाईकांना बाहेर पाठवून तिला धमकावत लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता आराेपीने नंतर महिलेच्या घरी जाऊनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.sexual assault घटनेने हादरलेल्या पीडिते महिलेने धैर्य दाखवत सक्करदरा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी तत्काळ कारवाई करत आराेपीला अमरावती येथील डब्बीपुरा परिसरातून अटक केली.
.....