देशाच्या प्रगतीत भाजपाचे महत्वपूर्ण योगदान

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
कुरखेडा, 
BJP's contribution to the country भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा पक्षाचा सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असून भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरिता श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व अनेक पक्ष अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना जोडून भाजपा पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप पक्षाला ओळखले जात आहे. राष्ट्रसेवा, सुशासन आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित भारतीय जनता पक्षाने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
 
 
bjp
 
 
कुरखेडा येथील भाजपा कार्यालयासमोर भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष माजी पंस सदस्य चांगदेव फाये होते. प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, अनुसूचित जाती माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, माजी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रामभाऊ वैद्य, शहर अध्यक्ष तथा सभापती सागर निरंकारी, भाजप तालुका महामंत्री विनोद नागपूरकर, आदिवासी आघाडीचे नेते कृष्णाजी चंद्रमा, आदिवासी आघाडी तालुकाप्रमुख रमेश पुराम, रामकृष्ण मुंगणकर, जिल्हा सचिव रुपाली कावळे, तालुका उपाध्यक्ष जयश्री मडावी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रजनीगंधा बनसोड, शहर महामंत्री सुनिता दखणे, कल्पना मांडवे, कविता खडसे, महामंत्री मंगेश मांडवे, अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंगराज कराडे, सुखदेव कापगते आदी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवित भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री विनोद नागपूरकर यांनी केले. प्रास्ताविक रामकृष्ण मुंगनकर तर आभारप्रदर्शन मंगेश मांडवे यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.