नागपूर,
Suvarnakar Mahila Mandal सर्व शाखीय सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने चैत्र गौरीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेविका माया हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. ओमकारनगर येथे शीतल विनोद येरपुडे यांच्या निवासस्थानी भारती रोटे माळवी यांनी पान-फुलांची आकर्षक सजावट करून गौरीची प्रतिष्ठापना केली. कार्यक्रमाची सुरुवात पूजा आणि आरतीने झाली, त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. गाणी, भजन तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आंब्याचे पन्हे आणि इतर नाश्त्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
या कार्यक्रमासाठी मीना पाचकवडे, लता खापेकर, कुमुद गायकवाड, गीतांजली बनकर, अनुपमा हिरुळकर, उमा पाटील, प्रतिभा इनकाने, सुषमा सकाळकर, मनीषा बनकर, अरुणा उजाईणकर आणि श्रेजल येरपुडे यांनी सहकार्य केले. Suvarnakar Mahila Mandal कार्यक्रमात सुवासिनींनी एक मिनिटांच्या खेळांद्वारे मनोरंजन केले. शेवटी सर्वांना पन्हे व नाश्ता वितरित करून कार्यक्रमाचा आनंददायी वातावरणात समारोप करण्यात आला.
सौजन्य: भारती रोटे, संपर्क मित्र