हावरापेठ मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Hawarapeth temple हावरापेठ हनुमान मंदिर सभागृहामध्ये चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त घटाचे व देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दुपारी - भजनाचे सादरीकरण करण्यात आले. देविला नैवेद्य दाखवून परिसरातील महिला मंडळने मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची वर्दळ कायम होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी आरती करुन चैत्र गौरीच्या खास प्रसादाचे वाटप करण्यात आले.‌ यावेळी- सारीका कुलकर्णी, कविता गवळी, संध्या रणदिवे, निर्मला तेलपांडे इत्यादी बरेच महिला उपस्थित होत्या.

Hawarapeth temple
 
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र