वाशीम,
Controversial PSI Sunil Giri suspended वाशीम शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पीएसआय सुनील गिरी यांच्यावर आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी त्याचेवर थेट निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे वाशीम पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाशीम शहर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून पीएसआय सुनील गिरी हे सतत वादाच्या भोवर्यात अडकलेले दिसले. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली. पोलिस अधिकारी म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि विश्वासाच प्रतीक असतं. पण इथे मात्र गिरी यांनी वेगळीच ओळख तयार निर्माण करून दबावतंत्राचा वापर केला.

तपासा दरम्यान किरकोळ प्रकरणात आरोपींना उचलून आणणे, आवश्यकता नसतांना तासनतास त्यांना ठाण्यात बसून ठेवणे, उलट सुलट प्रश्न विचारून समोरच्या व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक त्रास देणे. असे अनेक कारनामे पीएसआय गिरींचे जग जाहीर झाले होते. दरम्यान पीएसआय गिरी यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या काही अत्यंत गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारेंनी त्याच्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी मंगरूळनाथ येथील एसडीपीओ यांच्याकडे सोपविण्यात आली असून चौकशीनंतरच आरोपामध्ये किती तथ्य आहे. हे स्पष्ट होणार आहे.