पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
झरीजामणी, 
Deendayal Upadhyay Training Camp तालुक्यातील मुकुटबन येथे श्रीराम मंदिरात पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या निवासी कार्यशाळेच्या सत्रातील वक्ता म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व कामगिरी या विषयावर झरी तालुका येथील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला.
 
 
jari
 
Deendayal Upadhyay Training Camp  लोकाभिमुख असणाèया सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याकरिता व खèया लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळवून देण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भूमिकाही सकारात्मक ठेवून त्यासाठी तळागाळात कार्य करण्यासंबंधी हे प्रशिक्षण सत्र महत्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षण सत्राकरिता जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चौहान, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वक्तेराम मेल्केवार, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, पंचायत समिती माजी सभापती अंकुश बोढे, जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र पवार, शेतकरी नेते नितीन वासेकर, जिल्हा सचिव नागेश घुगुल, सतीश नाकले, राजेंद्र गोंड्रावार, मुन्ना बोनेलवार, अनिल पावडे उपस्थित होते. पश्चिम क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, महिला व पुरुष सदस्य कार्यशाळेकरिता उपस्थित होते.