रस्ता खचल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसमवेत नागरिकांची अडचण

रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
मानोरा,
Demand for urgent road repair शहरातील रहमानिया कॉलनीमधील रहदारीचा रस्ता खचल्यामुळे या रस्त्याने ये जा करणार्‍या विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, खचलेला नादुरुस्त रस्ता नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती कादर लंघा यांच्यावतीने नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
 
 

Demand for urgent road repair 
 
खचलेल्या रस्त्या लगतच उर्दू शाळा असून शाळा सुटल्याबरोबर या शाळेतील विद्यार्थी उपरोक्त खचलेल्या रस्त्याने धावत पळत घराकडे सुटतात ज्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शयता असल्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन नगरपंचायत च्या मुख्याधिकार्‍यांना लंघा यांच्यावतीने देण्यात आले आहे. उपरोक्त रस्त्यावरून स्थानिक दुचाकी स्वारासह, चार चाकी स्वार आणि मालवाहतूक करणारे अवजड वाहने सुद्धा सातत्याने येजा करतात ज्यामुळे हा रस्ता निर्मिती करताना मजबूत व पारदर्शक पणे करण्यात येण्याची मागणी सुद्धा निवेदनकर्त्याच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
 
 
नगरपंचायत च्या अभियंता यांना खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात सूचना केल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी उमेश राठोड यांनी दै. तरुण भारतला दिली.