अपघातात वृद्ध महिलेचे दोन्ही पाय निकामी

*देवळी बसस्थानकातील घटना

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
देवळी, 
accident : शहरातील बसस्थानकात आज मंगळवार ७ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
ACCIDENT
 
 
 
नागझरी येथील शकुंतला चोखोबा पाटील (७०) रा. नागझरी या बसस्थानक परिसरात बस पकडण्याच्या प्रयत्नात होत्या. दरम्यान, नागपूरहून यवतमाळकडे जाणारी एम. एच. १४ एम. एच. २७३३ क्रमांकाची बस बसस्थानाकात येत होती. याचवेळी बसची मागील बाजूचा धका लागून शकुंतलाबाई खाली पडल्या. त्यानंतर बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पायांवरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर तातडीने जखमी महिलेला वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना सेवाग्राममार्गे नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 
 
या प्रकरणी बसचालक प्रदीप शिरसाट रा. नाचणगाव याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल मंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर साखरे, स्वप्निल वाटकर व धर्मेंद्र गिरी करीत आहेत.