अनिल कांबळे
नागपूर
explosive stockpile found शहरातील नेहमी गजबजलेल्या दोसर भवन मेट्रो स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी विस्फोटकाचा मोठा साठा सापडला आहे. त्यात१५ जिलेटिनच्या कांड्या, ५० डिटोनेटर्स आणि ८ कनेक्टर चा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अतिशय संवेदनशील परिसरात ही स्फोटके सापडल्या आहेत. ब़ॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह फॉरेन्सिक टीम आणि पेसोची टीम ही तिथे पोचली आहे. संपूर्ण परिसराचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर्स असलेली बॅग या घरा खाती पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमक्या या जीलीटिन कांड्या आणि डेटोनेटर्स कशा तिथे पोहोचल्या याचा पोलीस तपास करत आहे.
दोसर भवन मेट्रो स्टेशनला लागून असलेल्या लांजेवार यांच्या घरासमोरील जागेत स्फोटकांनी भरलेली पेटी सापडली. बेवारस स्थिती ही पेटी गेल्या १८ दिवसांपासून पडून असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी पाहणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या दिसल्या. त्यानंतर लगेच बॉम्ब शोध व नाशक पथकासहस न्याय वैद्यक टीम आणि पेसोच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
स्फोटकांनी भरलेली ही बॅग काटोल येथील एस. बी. एल. कंपनीतील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या भिषण स्फोटानंतर ही स्फोटके नेमकी कुठे चालली होती, यावरून आता शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स येथे सापडल्याने या मागे घातपाताचा कट होता का, यावरून आता पोलिस यंत्रणेला धक्का बसला आहे. याचा छडा लावण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा ताफा या परिसरात उपस्थित होता.