नागपूर,
Fourth annual festival of Nikalas Mauli निकालस माऊलींचा चौथा वार्षिक उत्सव यंदा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व निकालस भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. सोमलवार, आवंढे, वाराणशिवार, बक्षी आणि कावडकर या पाच कुटुंबांकडून माऊलींची सेवा नियमितपणे केली जाते. उपासनेच्या या कार्याला चार वर्षे पूर्ण झाली असून दर गुरुवारी घरोघरी उपासना केली जाते. वार्षिक उपासना मात्र सर्व भक्त एकत्र येऊन इतवारी येथील निकालस मंदिरात आयोजित करतात.
यावर्षीच्या कार्यक्रमाला सुमारे ४० भक्त उपस्थित होते. माऊलींची पदे गात सामूहिक आरती अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडली. या उपासनेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित भक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली. Fourth annual festival of Nikalas Mauli संपूर्ण कार्यक्रमात भक्तांनी माऊलींच्या सेवेत आनंद अनुभवला आणि सर्वांवर माऊलींचे आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सौजन्य: कल्पना वाराणशिवार, संपर्क मित्र