- बेदम मारहाण करून तरुणाची हत्या: 4 तासांत आराेपी गजाआड
दिनांक :07-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
friend murdered मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनावधानाने मित्राची चप्पल पायात घातल्याच्या किरकाेळ कारणावरून उद्भवलेल्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाची लाठी-काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रामटेक पाेलिस ठाण्यांतर्गत सलीम खान विटाभट्टी परिसरात घडली. या प्रकरणात रामटेक पाेलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या चार तासांत चारही आराेपींना अटक केली. उमेश निषाद (वय 19), गणेश निषाद (वय 37, दाेघेही रा. सलीम खान विटाभट्टी, चाैघान, ता. रामटेक) आणि सुनील निषाद (वय 29) व इतवारी निषाद (वय 35, दाेघेही रा. ताला, जि. बिलासपूर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. समीर राजू नैताम (18) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक समीर हा मुळचा छत्तीसगडच्या बलाैदा बाजार जिल्ह्यातील धाबाडीह येथील रहिवासी असून रामटेक येथील सलीम खान विटाभट्टीवर कामाला हाेता आणि तेथेच राहात हाेता. त्याच्यासाेबत त्याच्याच गावचा समीर महेश नैताम (वय 18) हा सुद्धा तेथे कामाला हाेता. गत 26 मार्च राेजी दाेघेही रामनवमीनिमित्त गडमंदीर येथे िफरण्यासाठी गेले हाेते. दर्शन झाल्यानंतर दाेघेही मंदिरातून बाहेर पडले. यावेळी चुकून समीरची चप्पल उमेशच्या चपलेशी बदलली. यावरून उमेशने समीरला ‘चाेर’ म्हणत शिविगाळ केली.friend murdered त्यावेळी समीर तेथून चुपचाप निघून गेला. मात्र रविवारी रात्री 8:30 ते 9:00 च्या सुमारास ताे समीरसाेबत याचा जाब विचारण्यासाठी आराेपीकडे गेला. ‘चाेर’ म्हटल्यावरून त्याचा उमेशशी वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत हाेऊन उमेश निषाद आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून समीरला लाठी-काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात समीरच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.